तीन वर्षाचे जीवन...
कातरवेळी क्षितिजावर
मावळणारा सूर्य बघा........प्रत्येकाच्याच मनी उदय होतो तो आपण जगलो, काही खास
जगलो,, त्या क्षणांचा...
मी ही जगलो येथे....काही
क्षणात भरपूर जीवन...
अगदी admission चा पहिला
दिवस तो, hostel च्या रुमला लॉक करून चावी जूनियर च्या हातात देई तोपर्यंतचा
क्षण..सर्व कस मनात घर करून बसलय...परत त्याच घरी परताव वाटत...
येथे खूप खूप शिकलो,,
कदाचित थोड शिकवलही....
परत खूप वर्षांनी
(शाळेसारखी) शिक्षकांशी ओळख झाली,, कदाचित मी ही त्यांना थोडा ओळखीचा झालो...
नवे मित्र..अगदी थोड
चेहर्यावर हसू आणून मैत्री टिकवणारे,, तर कुणाच्या खांद्यावर ढळा ढळा रडावे;
असे बहुरंगी मित्र मिळाले,,
कदाचित काहींचा मी ही एक
खरा मित्र झालो..
खूप फिरलो,, खूप हसलो,,
खूप रडलो..
कधी स्वच्छंदी, कधी
अवघडलो,, पण येथेच घडलो..
घाटीतील ते तीन वर्ष कसे
तीन क्षणांसारखे निघून गेली,,
आणि आज जवळ आहे ते
दाटनारे मन..कधी हसूत कधी आसुत..
ती भाषा अभिलाशेची...कधी
नवी आशा,, कधी निराशाही..पण थेंबाथेंबांनी आठवांचा आज उदधी झालाय..
आणि मन हंस बनून त्यावर
पोहते आहे..
त्या सर्व भावनांना एका
कवितेत एकत्र करणे मला खूप कठीण आहे..
ते जीवन शब्दबन्धनाच्या
पलिकड़ल...
कारण ते मी जगलो...खूप
खूप जगलो..
आज नवचैतण्याने जगतांना,,
आठवते...
“ते तीन वर्षाचे जीवन,,
तेथे जगलेला प्रत्येक
क्षण,,
पाउल पुढे चालतांना,…
अडखडत;
तेथून परत न येणारे मन..”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा