"Welcome"

"Welcome"

शनिवार, १० डिसेंबर, २०११




 "मैत्री.."
जिवनातील प्रत्येक प्रवाहावरती,
नवे मित्र, नवनवे संघर्ष आहे,,
कधी नूतन मैत्रीचा मधुर स्पर्श,
तर मित्रांच्या कप्प्यात कधी चेष्ठा, कधी हर्ष आहे..

                  कधी जिंकतो, कधी चुकतो,
                  प्रत्येक क्षण एक नूतन आठवण आहे,,
                  वात्सल्य, स्नेह, प्रेमाने ओतप्रोत,  
                  खरच मैत्री हे एक जीवन आहे..

मजकडे . दि. मा. सारखी प्रतिभा नाही,
पण आपल्यासारख्या  कृष्णाचा सहवास आहे,,
म्हणूनच सुदाम्याला सहज शब्द स्फुरले,
बाकी हि कविता तर आभास आहे..

                  मैत्री..
                  कुणासाठी फक्त दोन शब्द,
                  तर कुणाची कुराण गीता आहे,,
                  कुणाची प्रीतीची थेंबा थेंबाची क्षुधा,
                  कुणासाठी स्नेहाची अविरत सविता आहे..

मला..
मी यशोशिखरी पोहचलो तरी,
मित्रांवाचून रिता आहे,,
कारण...
जिचा आरंभ ही नाही अन अंत ही नाही,
"मैत्री" अशी एक कविता आहे..
                      डॉ. सचिन शेंडे

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..


आदी आधारावर आई, आजही दुख्खात पहिले तुझेच नाव येई,,
नमन विश्वाच्या प्रथम गुरूला, आई  तुजमुळे आज मी सर्वकाही..
गुरुविण पूर्ण कसा मी, शिक्षकांनी दिलेल्या सुसंस्कारात आहे,,
त्यांच्याच आशिषने आज, आपल्या विद्यार्थी परिवारात आहे.. 
माझ्या शिक्षकांवर एक कविता लिहून, 
          मला कृतज्ञता सिद्ध करायची नाही,,
आपल्या आज्ञेत आणि स्नेहात,
                   एकलव्याची कथा स्मरायाची नाही..
ज्या क्षणी चुकेल सर त्या क्षणी छडी द्याल,,
गुरुशिष्याच्या नात्यातील प्रीत आजही आहे
         ती कधी गृहीत धरायची नाही..
तुमची प्रेरणा तुमचा प्रकाश,
                  माझ्या अदभूद्द्याचे प्रतिक आहे,,
तुमचा विद्यार्थी म्हणून गोड आठवात रहावा
         हे स्वर्ग सुखावून अधिक आहे..
आपल्या अनुभवाचा आधार आहे
         आणि या सुशील सह्वासाबद्दल श्री चा आभार आहे,,
आपल्या आदरात, सख्यांच्या स्नेहात,
         हा औषधशास्राचा हा आनंदी परिवार आहे..
सर वर द्या  कृतज्ञतेचा, चरण स्पर्शून हेच समर्पण नवे,,
मागणे एकच...
जन्मभर पुरेल इतके भरून आशीर्वाद हवे,... 
        जन्मभर पुरेल इतके भरून आशीर्वाद हवे...
                                                                        
                                                  सचिन शेंडे...दि.५/९/२०११ 

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

"स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"


"स्वातंत्र्य दिन चिरायू होवो"
१५ ऑगस्ट २०१० 

आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..

आसेतु हिमाचलाप्रमाणे इथे प्रत्येकाला अभय आणि स्वाभिमान आहे,
गंगेप्रमाणे पवित्र इथली मने, जिंकण्या बुद्धाप्रमाणे अटळ ध्यान आहे,
का न? मला माझा गर्व व्हावा, कि हा हिंदवी स्वर्ग माझा आहे,
या भारत भू ला शतदा नमन, जिच्या प्रत्येक दर्शनी मंगेश आहे..
आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..

आज वंदे मातरम म्हणतांनी जो प्रत्येक मनात अभिमान आहे,
सार्वभौम, सर्वधर्मसमान संस्कृतीचा माझा देश महान आहे,
"स्वातंत्र्य दिन चिरायू होवो"  यातच आमचे सौख्य सामावले आहे,
असंख्य हृदयाचा जिथे एक उदय, अनेक भाषा अनेक वेश आहे,,
आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..
क्रमशः..

१५ ऑगस्ट २०११ ..
तोच अभिमान तोच दिन...
त्याच भावना, तोच सचिन..
तरीपण...
चौसष्ठ वर्षानंतरही, तीनशे चौसष्ठ दिनानंतरही हाच एक संदेश आहे,,
आज मला पुन्हा आठवले कि, "भारत माझा देश आहे."..

आज पुन्हा गांधीजींना हार घालून, 
सत्य,अहिंसेवर प्रहार होईल,,
पुन्हा मातृभूमीचे शतदा आभार मानून, 
जन्मदेवरच मी भार होईल,,
फक्त कारणे बदलते आहे, 
तिच हिंसा, असहकारही आजही कायम आहे,
विकासाच्या पावली वर्षेही बदलली, 
तरी या अदभूदयातही गांधीना का? क्लेश आहे..१ 
आज मला पुन्हा आठवले कि...

कुणी पोट शांत कराया घाम गाळतो, 
कुणाचे एसीत शांतीच्या नाऱ्यावर घाम गाळणे,,
असंतोषाला शिष्ठचारात सांभाळून, 
भ्रष्ठाचाराविरुद्धच्या घोषणा फक्त भाषणा पुरत्या पाळणे,,
शहिदांच्या रक्तातील आक्रंदन, आवाहन, 
का? आम्ही मौन म्हणून पाळतो,
स्वातंत्र्याच्या संतोषी संस्मरनातही,
 का? आज प्रत्येक शब्दात द्वेष आहे..२ 
आज मला पुन्हा आठवले कि...

कसले स्वराज्य? स्वतः चे कि "राजाचे",
नुसते कोट्यानु कोट्यांचे घोटाळे,,
कसली राजनीती? सगळी "राजाची" अनीती,   
हि वस्तुस्थिती जो तो टाळे,,
स्वातंत्र्य दिनावर एक कविता लिहून 
मला माझे देशप्रेम सिद्ध करायचे नाही,
"माझा देश आणि  माझे बांधव"
 यातच सौख्य सामावाल्याचा हा त्वेष आहे..३ 
आज मला पुन्हा आठवले कि...
सचिन शेंडे दि. १५ ऑगस्ट २०११..
"स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"

शनिवार, ३० जुलै, २०११

कविता..


अचानक पाउस आला कीआठवणींना पूर येतो,,
मनात आटलेल्या प्रीतीलाओलचिंब करून वाहून नेतो..                                            

विरहाच्या वाळवंटात, तुझ्या स्मृतींनी मिळतो गारवा,,
वरुणाची करूणा घेवून, मी शब्दांशी प्रवाह धरतो नवा..

थेंबाथेंबांची वाट पाहता, आला पावसाचा लोट,,
तुझ्या स्वैच्छिक स्पर्शासाठी, आतुरले माझे ओठ..

तुझ्या लावण्याच्या लालसेत, मन पाऊस पाऊस,,
क्षुधा उदकाची घेवून, शिराव उदधित जस..

न्हावून निरात नभाच्या, विरले अश्रू नयनातले,,
ओतप्रोत प्रमोद देणारे, शब्द शोधिले मी मनातले..

व्यथा विरहाची विसरून, जीवनाने भरल्या सविता,,
प्रीत बघून धरेची, अवतरली अंबरातून कविता..
                           
सचिन शेंडे..दि. ३०/०७/२०११ 

शनिवार, ४ जून, २०११

...सूर्यास्त...


                              
जेन्हा काळ्याभोर शेतात, हिरव्यागार रोपट्यांवर, सोनेरी किरणे पडते,,
तेंव्हा सृष्ठितील सर्वश्रेष्ठ सौंदर्याचा एका क्षणात साक्षात्कार घडते..

हे भलेमोठे धिप्पाड वृक्ष जेंव्हा मजपासून कनाकांना लपवितात,,
आणि आपल्या शितल पल्लवीला रवीच्या रश्मीने तपवितात..

तेंव्हा असं होत, मजकडे येणारी स्वरूप तनुजा येतांना मध्येच वळली,,
मी बहरतांना पाहिलेल्या गुलमोहराची जणू क्षणात पाने गळली..

पुन्हा एकदा क्षितिजावरती अरुणाची करूणा  मला  मोहिते ,,
आणि सरोवराच्या स्तब्ध सलीलात तांबडे रेशीम पोहिते..

जेंव्हा माझ्या चोरून भास्कर लपून ढगाआड जातो,,
तेंव्हा गाडीमध्ये नजर फिरविताच मजसोबत एकांत राहतो..

अस्ताची चाहूल असूनसुद्धा ती सूर्याची जिवंत रसिकता,,
सुगंध जवळ नसूनसुद्धा सुमनांना लाजवणारी सुवासिकता..

परार्था प्रकाश देण्यासाठी तुझे प्राचीला येणे,,
त्याच व्याकुळतेने आजच्या अस्तालाही अपुले म्हणने..

भास्करा तू तुझा देह गर्वाने गिरी आड नेणे,,
मी विसरू कसे कळेना दृश्श ते जीवघेणे..

कसा मी मृत्यूला आठवात घेवून जगणे विसरत होतो,,
कोण इथे अमर्त्य मित्रा, प्रचंड प्रकाशातही तमाला स्मरत होतो..

दिनकरा, तुझ्या दयेचा जरी हा रोजचाच आविष्कार,,
जरी उदयाचा मोह जगाला, आज दिला मला, सुर्यास्तानेच सुविचार..
                                                 
                                            ..सचिन शेंडे.... दिनांक..४/६/२०११..

सोमवार, २ मे, २०११

घाटीतील नूतन मित्रांना एका कवितेत एक करण्याचा हा तुटक प्रयत्न..


नवे मित्र, नवे शहर,....
नवे अनुभव, नवी लहर,...
नवा बहाणा, आलाय कवितेचा बहर.....

मी चैतन्य जसा अबोल तसा धन्य, कवितांचे संगे घेवून सैन्य,,
समिरासाराखेच माझे अस्तित्व, ते जाणवते जरी दिसते नगण्य..

राहुल तुझ्यासह प्रत्येक पाऊलावर, दुखांनी चाहूल सुद्धा केली नाही,,
माझ्या मनातील हळवेपणाला तू हळुवार सावरतांना, चाहूल सुद्धा दिली नाही..

नावापेक्षाही निर्मळ, सरळ तसा दुर्मिळ ही, जणू सहजतेचा अनन्वय,,
कधी कठीण कौस्तुभ, कधी घाटीतील कनवाळू केतानात, प्रेम क्षेमाचा समन्वय..

बलवंत तुझे असणे जिवंत,  जणू प्रशांत विनोदाची आरास अनंत,,
क्लेशाचा विनाशकारी निलेश, शैलेशसंतोषविजयानंद असल्यावर कसली खंत..

कपिलाचा प्रगल्भ प्रकाश आम्हा, अन किरण हे अदभूद्याचे,,
आम्ही श्रीराम स्थिर महावीर, घेवूनी ध्येय उदयाचे, ठेवतो बंध हृदयाशी हृदयाचे..

श्याम असा सुंदर सखा, मग बघा, का न? मला माझा गौरव नसावा,,
ज्या अतुल अनुरागने आपणासह माझी आपुलकी, मी ही तितकाच आपला असावा..
मी ही तितकाच आपला असावा…. मी ही तितकाच आपला असावा….

 या अवघ्या सात महिन्यातच, घाटीच्या सप्तरंगात रंगणारे आम्ही,,
रुग्नांच्या एकेक वेदनेला, जखमेला, आईच्या हाताने स्पर्शणारे आम्ही,,
आज रसिक बनून जीवन जगू शकत नसलो, तरी जीवनात रसिकता जपणारे आम्ही,,
आज मंगळावर जीवन शोधू शकत नसलो, तरी जीवनात मंगळ शोधणारे आम्ही..

अशा माझ्या सर्व पी . जीमित्रांसाठी ,,

मी यशो शिखरी पोहचलो तरी आपणावाचून रिता आहे,,
कारण....
जिचा आरंभ ही नाही आणि अंत ही नाही, मैत्री अशी एक कविता आहे..
 मैत्री अशी एक कविता आहे.. मैत्री अशी एक कविता आहे…..


आपलाच 
सचिन शेंडे..