"Welcome"

"Welcome"

रविवार, ३ एप्रिल, २०११


पुढल्या क्षणात……..

येणारा प्रत्येक क्षण जाणारच, वेळ कुणाची धरोवर नाही,,
पण तू ही येवून क्षणात जाते, हे मात्र बरोबर नाही..

तुझ्या गंधात पसरून बेधुंद झालो, नकळत जुळला बंध,,
हे प्रीत सुमना, गंधाला बांध, तू माझी जोवर  नाही..

आजही मन माझं, तुझ्या वाटेवरून परतत नाही,,
पावलेही तिथेच थांबते, मन  भांबावते, खरंच तू खरोखर नाही..

तू आली, स्वप्ने पूर्ण झाली, तुझे आश्वासने ही का, स्वप्न होती?
आज जागवून रागावले नाही, का? तू स्वप्नात पण समोर नाही..

तुझ्या ओल्याचिंब आठवणीत न्हावून, आज पावसात ही भिजून कोरडा,,
तू जाता..आसवे ही सुकली आता, मी माणूसच गं, सरोवर नाही..

अबोला रुसल्या मनाचा, बोलका गंध सुमनचा, बघ गुदमरतो गं,,
मन हरले, गहिवरले, पण विस्मरेल तुला, मी तो मनोहर नाही..

आता या क्षणात माझी हो, मनात, रणात, वा मरणात एकदाची,,
कारण........
क्षणो क्षणी तुझा राहणारा मी, पुढल्या क्षणात राहणार नाही..

सचिन शेंडे.. //११
...चारोळ्या... 




जगातील सर्वात स्थिर गोष्ट ,
बदल हीच आहे ..
तरीपण स्वतहाला बदलायच म्हटल ,
की परिस्थिति तीच आहे ..


मी ज्यांच्यावर प्रेम केल,
त्यांचाच मजवर राग आहे ..
म्हनुनच माझ्या ललाठावर,
एकठे पणाचा डाग आहे ..‌


ठगने -जगने, हसने-रडणे ,
हे जीवन किती छान आहे ..
अज चौफेर वर्षाव चैतन्याचा ,
उद्या संकटांचे थैमान आहे ..



स्वार्थी या युगात खरंच,  
कुणी कुणाचा नसतो,,
ज्याच्या मिठीत प्रीत मिळाली,
त्याच्याच हातात आयुध असतो..

मी हृदयाला बाजारात घेवून बसलो,
पण प्रेम मात्र खपलं नाही,,
कारण विरहान फाटलेलं काळीज,
ग्राहकांपासून सुद्धा लपलं नाही..