पुढल्या क्षणात……..
येणारा प्रत्येक क्षण जाणारच, वेळ कुणाची धरोवर नाही,,
पण तू ही येवून क्षणात जाते, हे मात्र बरोबर नाही..१
तुझ्या गंधात पसरून बेधुंद झालो, नकळत जुळला बंध,,
हे प्रीत सुमना, गंधाला बांध, तू माझी जोवर नाही..२
आजही मन माझं, तुझ्या वाटेवरून परतत नाही,,
पावलेही तिथेच थांबते, मन भांबावते, खरंच तू खरोखर नाही..३
तू आली, स्वप्ने पूर्ण झाली, तुझे आश्वासने ही का, स्वप्न होती?
आज जागवून रागावले नाही, का? तू स्वप्नात पण समोर नाही..४
तुझ्या ओल्याचिंब आठवणीत न्हावून, आज पावसात ही भिजून कोरडा,,
तू जाता..आसवे ही सुकली आता, मी माणूसच गं, सरोवर नाही..५
अबोला रुसल्या मनाचा, बोलका गंध सुमनचा, बघ गुदमरतो गं,,
मन हरले, गहिवरले, पण विस्मरेल तुला, मी तो मनोहर नाही..६
आता या क्षणात माझी हो, मनात, रणात, वा मरणात एकदाची,,
कारण........
क्षणो क्षणी तुझा राहणारा मी, पुढल्या क्षणात राहणार नाही..
सचिन शेंडे.. ३/४/११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा