"Welcome"

"Welcome"

शुक्रवार, २१ मार्च, २०१४

कधी मनात



"या श्रावणात जरा"

खूप खूप दिवसांनी…. 
मनाशी खेळलो तर वेदना होणारच,, वरच्या आतल्या जखमातून सावरतांना जणू मी माझ्यातील प्रीतच हरवून बसलो… पण आज परत मिळाली माझी पहिली प्रीत, माझी कविता… 

"या श्रावणात जरा"

सजलेली हिरवीगार धरा,, या श्रावणात जरा ।।
काळ्या काळ्या मेघांसह, साद घाली अम्बरा ।।

हिरवा हिरवा ऋतू, आणि तूची तू हवा,,
एक आठवण तुझी, कितीदा छळते अंतरा ।।

माझी प्रीत कधी 'भू' वर कधी गगनात,,
कधी… थेम्बाथेंबांनी शिरते सागरा ।।

सुखात गरजतो, दुखात बरसतो भरभरा,,
जसा ऊनपावसाचा श्रावण, मी श्रावणाचा जरा ।।

तुझ्या गंधातिल मधुरतेने, आनंदी आनंद नभभर,,
जर तू मनभर तर, कविताही अखंड प्रीतीचा झरा ।।

गार वारा प्रफुल्लीत सारा, स्पर्शून तुला,,
हर्षविते मला, बनून निर्झरा प्रीत वाहते अक्षरा ।।

कधी मनात,, कधी उन्हात,, कधी या श्रावणात जरा,,
कधी तुझ्यात,, कधी माझ्यात,, पण जगतो कवितेत खरा ।।

चैतन्य.....

तुझे हात,

तुझे हात, माझ्या हाती असावे,,
डोळे मिटले तरी तू दिसावे,,

स्वप्नही तुझ्या श्वासांनी जगावे,,
जाग आली की प्रथम तुला बघावे,,

तुझ्या मिठीत मी मधहोश व्हावे,,
अन् घट्ट ओढून तू मज जागे करावे..


चैतन्याकृत 

तुझा स्पर्श जणु...

तुझा स्पर्श जणु...

गार शांत वारा,

आसमंत सारा,

प्रफुल्लित ॥


तुझा स्पर्श जणु...

तळ्यातिल शशी,

प्रतिमा ती कशी,

एकजीव ॥


तुझा स्पर्श जणु...

ओलिचिंब माती,

सुगंध हा हाती,

दरवळे ॥


तुझा स्पर्श जणु...

मावळता रवी,

भूधरेची नवी,

प्रेमगाथा ॥

चैतन्याकृत 

तुझ्या आठवांनी

तुझ्या आठवांनी
नयन बोलके,
मन हे हलके,
पिसांपरी॥

तुझ्या आठवांनी
सौख्य मनभर,
स्नेह सरसर,
वाहू पाहे॥

तुझ्या आठवांनी
मन माझे स्थिर,
जगन्यास धीर,
माझा मला॥

चैतन्याकृत 

नातं

तुजविन सख्या रे…


बुडलेली नाती

बुडलेली नाती

सुकलेली पाती,

भिजून आज ती,

ओली नाही....

मी मला शोधता


मी मला शोधता
 
तू आणि कविता, 


दोघांवीन रिता, 


पूर्णतहा।।


शब्द माझा आत्मा

कविता हे धन,

सुंदर जीवन,

चैतन्याचे।। 

चैतन्याकृत 

मैत्री


गुरुवार, २० मार्च, २०१४

निर्मळ मैत्री..

कधी प्रेमात कधी क्षेमात
अवखळनारी ही निखळ मैत्री,,

कधी तुझी कधी माझी
कधी दोघांची ही निव्वळ मैत्री,,

कधी हुरहुरणारी कधी मोहरनारी
कधी मनातील ही तळमळ मैत्री,,

कधी धरेवर कधी अंबरी
बहरणारी ही निर्मळ मैत्री..



 चैतन्याकृत …  

तुजविण सख्या रे..

तुजविण सख्या रे..

मी निजेलाही झालो पारखा,,
कोमेजतो मी लाजाळू सारखा,,
रात्र टाळू कशी रे...
                      
गारवा बोचका, हुरहुर आतुर मी,,
सर्वात असूनही मजपासुन दूर मी,,
दुरावा छळतो भरपूर रे..

कंप अधरावर, कासावीस मन,,
तू स्पर्शील्यावर, थांबलेले क्षण,,
जगनेही तिथेच अडकले रे..

श्वास ही आभास भासते कसे करू,,
कोवळे उन्ह ही मला लासते कसे करू,, 
एकटा रडतो रे...
आठवात ओल्या वेड्यागत अजून फिरतो,,
परतीच्या वाटेवर स्वप्नात जग विसरतो,,
जुडून पुन्हा तुटलो रे..


तीन वर्षाचे जीवन...

तीन वर्षाचे जीवन...
कातरवेळी क्षितिजावर मावळणारा सूर्य बघा........प्रत्येकाच्याच मनी उदय होतो तो आपण जगलो, काही खास जगलो,, त्या क्षणांचा...
मी ही जगलो येथे....काही क्षणात भरपूर जीवन...
अगदी admission चा पहिला दिवस तो, hostel च्या रुमला लॉक करून चावी जूनियर च्या हातात देई तोपर्यंतचा क्षण..सर्व कस मनात घर करून बसलय...परत त्याच घरी परताव वाटत...
येथे खूप खूप शिकलो,, कदाचित थोड शिकवलही....
परत खूप वर्षांनी (शाळेसारखी) शिक्षकांशी ओळख झाली,, कदाचित मी ही त्यांना थोडा ओळखीचा झालो...
नवे मित्र..अगदी थोड चेहर्यावर हसू आणून मैत्री टिकवणारे,, तर कुणाच्या खांद्यावर ढळा ढळा रडावे; असे बहुरंगी मित्र मिळाले,,
कदाचित काहींचा मी ही एक खरा मित्र झालो..
खूप फिरलो,, खूप हसलो,, खूप रडलो..
कधी स्वच्छंदी, कधी अवघडलो,, पण येथेच घडलो..
घाटीतील ते तीन वर्ष कसे तीन क्षणांसारखे निघून गेली,, 
आणि आज जवळ आहे ते दाटनारे मन..कधी हसूत कधी आसुत..
ती भाषा अभिलाशेची...कधी नवी आशा,, कधी निराशाही..पण थेंबाथेंबांनी आठवांचा आज उदधी झालाय..
आणि मन हंस बनून त्यावर पोहते आहे..
त्या सर्व भावनांना एका कवितेत एकत्र करणे मला खूप कठीण आहे..
ते जीवन शब्दबन्धनाच्या पलिकड़ल...
कारण ते मी जगलो...खूप खूप जगलो..
आज नवचैतण्याने जगतांना,, आठवते...

“ते तीन वर्षाचे जीवन,,
तेथे जगलेला प्रत्येक क्षण,,
पाउल पुढे चालतांना,… अडखडत;
तेथून परत न येणारे मन..”


कधी मनात ……


HAPPY NEW YEAR....2014

नववर्षारंभ
सर्वच हर्षात,
मायेच्या स्पर्शात,
नवे वर्ष॥

नविन संकल्प
मनाचा उत्कर्ष,
कळेशी संघर्ष,
नववर्षी॥

नूतन वर्षाची
पहिली पहाट,
आनंदाची लाट,
नववर्षी॥

नूतन चैतन्य
नवी अभिलाषा,
नविन उन्मेशा,
नवेवर्ष॥


दुःख विसरुन,
पुन्हा नवा प्रण,
उत्साहाचा सन,
नवेवर्ष॥

विजयी स्वागत
उमेद विश्वास,
विसरु आभास,
नववर्षी॥

प्रत्येक मनाचे
स्वप्न पूर्ण व्हावे,
चैतण्य रहावे,
नववर्षी॥

पहिले किरन
पहिले पाऊल,
साैख्याची चाहुल,
नववर्षी॥

वीसचाैदाची ही
पहिली कविता,
अर्पीतो ही मिता,
नववर्षी॥

भरभराटिचे
सुख सम्रुद्धिचे,
उदय व्रुद्धिचे,
नवेवर्ष॥

नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा॥

चैतन्याकडुन....
 

HAPPY TEACHERS DAY...


Dolor Song.. Doctor Song..

Hello Boys.. I am Writing Song..
Dolor Song.. Doctor Song..


Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Rhythm Correct..


Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Maintain This..
Why This Doctorite? wee..
Admission'la First Year
New dead bodies, Peer
formalin’ la nose block
eye’s full of Tear
Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Second year come come
Life full of cheer
Gathering’ la friends and love
Or DevD and beer
Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Mama, sorry.. Oh My Almighty Seniors
Don’t take me on fire
Papapa Papapapa Papapa Pa Pa..
No ragging..
Šuper Mama Ready.. Ready 1 2 3 4..
What A Change Over Mama..
Ok Mama.. Nøw Year Change'ju..
Hand'la Bat.. Only Study'sa..
Hand'la Štetho, Štetho in ear
Sounds'su Full'la fear'r
Empty Mind, S1,S2 or crept
No Heart and murmur hear’r
Lecture’la bunk, proxy in clinic, present in library and theater’r
Exam’la sleepless night, Ratta reading tight, praying to creator’r
Why This Doctorite Doctorite Doctorite wee?
Student Intern, Resident in turn, “Serving Life” is Devotion
Potion..lotion..for.. loose motion to Split emotion
God Thanku, for duty Delegation, Healing touch of Noble profession
This Šøng'gu Før Medical Student,
‘Who Make Difference”..Prudent
That’s why.. Doctorite Doctorite Doctorite wee..
That’s why.. Doctorite Doctorite Doctorite wee..

Sachin...

भावना जेथे शून्य होतात...

आत्मवृत्त..शव विच्छेदाकाचे...
(अवघ्या दोन महिन्यातच, फोरेन्सिक मेडिसिन च्या पोस्टिंग मध्ये-
अनुभवलेली एका विच्छेदाकाची ही व्यथा....)

एकही शब्द न बोलता, हृदयात सर्वांच्याच शिरतो आहे,,
भावनांना गहाण ठेवून, स्वतःचेच हृदय स्वतः चिरतो आहे..१

कराला साथ आयुधाचा, अश्रू आटले रक्ताच्या चिखलात,,
हरित सौख्य धरेचे लपले, शुष्क लालेलाल आक्रांतात..२

फाटक्या विश्वात फाडतो आहे, मग क्षमा कशाला माणुसकीची,,
जीवनालाच जगण्याची लाज नाही, काय ही माया नीतीची..३

सुखामागे धावणाऱ्या मानसा, तुझ्यापेक्षा खरच प्रेतं बरी,,
सर्वांना प्रीत देवून आसवांची, सांगतात दुखःची सीमा खरी..४

मी प्रेतामध्ये जगतो आहे, कारण काळजी आहे संसाराची,,
चिमुकल्यांसाठी चिरतो आहे, त्यांच्या करांना नको कळा 'या' काराची..५

मन सुखदुखः चे क्षितीज, जीवन आहे मरणाच्या आधारी,,
भावना जिथे शून्य होतात, तिथल्या व्यापाचा मी व्यापारी..६

हृदयांना कापता कापता माझे हृदय इतके विशाल व्हावे,,
सर्व अंतरातील दुखः नी या अथांग सागरात बुडुनी जावे..७

मी, शव विच्छेदक,, एक अस्थिपंजर अज्ञ अहर्निश आराधनेचा,,
ओतप्रोत प्रमोद देवून, मी यती 'या' व्यथित साधनेचा..८
चैतन्याकृत...

"HaPpY DoCtoR's DaY"

प्रत्येकाच्याच जीवनातील थोडा भाग, थोडा त्याग, 
वैद्यकीय सेवेला अर्पणारे आम्ही,,
व्यथीतांच्या कळान्ना गळा लावणारे, 
जीवनाला सुद्रुढ निरोगी बनविणारे आम्ही,,

अश्रूत ही निर्मळ हास्य पसरविणारे,,बधीर मनाला हर्षवणारे
..आम्ही
रुग्नांच्या एकेक वेदनेला, जखमेला, आईच्या हाताने स्पर्शणारे आम्ही,,

रसिक बनून जीवन जगू शकत नसलो, तरी जीवनात रसिकता जपणारे आम्ही,,
मंगळावर जीवन शोधू शकत नसलो, तरी जीवनात मंगळ शोधणारे आम्ही..

घाटीच्या सप्तरंगात रंगणारे आम्ही..अशा माझ्या सर्व डॉक्टर मित्रांना..

परीक्षा.......2

Exam hall मध्ये होणारे college दर्शन,,
वर्षभरही नसतं इतकं skillful observation..

क्षणात जातात तीन तास, कुणाचा चालतो स्वतः वर अभ्यास,,
आसपास जर कुणी खास, तर मग असतो full timepass..

शेवटची बेल वाजली कि, चुकतो हृदयाचा ठोका,,
"देख लेना" म्हणणारेच मग न दाखवून देतात धोका..

Supplement please..उत्तर लिहिता लिहिता प्रश्नांचा विसर पडतो,,
काय लिहिले, काय राहिले, काय पहिले, काय वाहिले..जिथे न तिथे अडतो..

कुणाचा वेळ बाकी, लिहाया शून्य; कुणाला शून्य वेळ,,
कसली प्रश्न? कसली उत्तरे?न ताळमेळ, नको हा ३ तासांचा खेळ..

Term end असो Prelims असो, वा जीवनाची परीक्षा; end एकच "फक्त रडा"
पण प्रत्येक परीक्षेनंतर आम्ही, शिकतोय नवीन धडा..

शेवटी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक समाधान असं असत,,
चला सुटलो, आटपला..तर कुणाच जीवनच out of syllabus असत..

परीक्षा.......1

नुसता शब्द उच्चारला तरी, प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अमंगळ पण तितकीच अटळ वेळ....
अगदी नावातच पर (दुसऱ्यांचा असा) भासणारा..आणि त्यातही नाईलाजणे स्वतः ला करावी लागणारी ताळमेळ.. 
प्रत्येकालाच नको असणारं, पण तरीही समोर जाव लागणारं सत्य....
अगदी पहिल्या इयत्तेपासून तर FINAL YEAR पर्यंत.....
वर्ष बदलते... वेळ बदलते...प्रश्ने बदलतात...
पण उत्तर एकंच..नको हा तीन तासांचा खेळ...

पण एक मात्र नक्की कि, या तीन तासात आपण नवनवीन धडे शिकून जातो...
"देखलेना दोस्त".."आजमालेना दोस्त" ...म्हणत फिरणारे मित्र...मित्रच...
ऐन परीक्षेच्या वेळी आपणाकडे बघतही नाही, तेंव्हा आलेला राग,,
कुठे शिक्षकाकडून हेल्प घेणारा SPECIAL GENDER विभाग,,
कधी वाचलेलं न आठवल्यामुळे आपलाच आपल्यावर हसण्याचा भाग,,
तर कुणाचा SPECIAL कुणासाठी TOTAL SUPPLIMENT दाखवून चाललेला त्याग,,
खरच..शब्द तोच..परीक्षा..पण कुणासाठी अनुराग..तर कुणासाठी विराग..

आणखी एक नक्की,,
परीक्षेची वेळ हि नशीब आजमावण्याची संधीच...नाही का..?
कुणी काल वाचलेले दोनच CHAPTER मधून दोन LAQ
तर कुणी पूर्ण SYLLABUS वाचून जे सोडतो तोच LAQ
कुणाची स्वतः ची चाललेली...कुणाची COMPETITOR शी चाललेली हि COMPETITION..EXAMINATION...

तसं पाहिलं तर जीवनही एक परीक्षा आहेत..नाही का?
फरक इतकाच...
त्याला कुणी वेळेचे बंधन देतो,, तर कुणी बंधानासाठी वेळेचीच समीक्षा घेतो..
शेवटचे...
जीवनातील प्रश्नांसाठी न कुठली QUESTIONS बँक असते न कुठला SYLLABUS...
आणि नसावेत सुद्धा…. नाही...?
जगायचं असतं फक्त एकंच उत्तर लिहून....
"आत्मविश्वास"...
आपलाच विश्वासू...

SOCIAL NETWORKING............ BOON OR BANE ????

फेसबुकवर तुला पाहता का? गंधाळून मन बहरत नाही,,
टाइम लाइन वर फिरुनी येता का? मोहरलेल्या स्मृती स्मरत नाही..
लाइक वा सुपरलाइक करूनही का? तिला आवडावे इतका लाइक होत नाही,,
फोटोवर कमेंट, पोस्ट फालो करूनही का? तिच्या मागाचा पण भागाचा पाइक होत नाही..
काही करण्याआधी स्टेटस अपडेट करून फक्त नोटीफिकेशनचे नंबर वाढवून घेतो,,
वर्चुअल फ्रेन्डशिप सर्कॅल एक्स्पांड करून खरच का? कुणी हृदयाच्या जवळ येतो..
फेसबुकवर लॉगइन करणे म्हणजे खऱ्या प्रेमाची सुरवात नव्हे,,
काही क्षणांसाठी लाइक, प्रेम मिळेललही पण जन्मभर साथ देइन असा हाथ नव्हे..

“पुरे झाले खेळ खेळणे वर्चुअल संगे उडन्याला..
फॉरम्याटिंग मी माझे केले अक्चुअल संगे जूळन्याला..”

नजरेसमोर तुला पाहता गंधाळून मन थरथरले
तुझ्या स्पर्शात शहारून तुझ्या गंधात स्वच्छंद बहरले..
तुझ्या हासऱ्या शिडकाव्याने, बीज आठवांचे अंकुरले,,
निशब्द तू पण प्रेमाने कुरवाळून, मन माझे का गहिवरले..
क्लिकवर नाही तर हाकेवर्ती प्रीयापाहून मन शिर्शिरले,,
ऑनलाइन नाही तर लोचानातील नीर बघून हृदय माझे हूरहुरले..

कवितेतील भाव अगदी सहज आणि स्वाभविक आहे,, क्षणात मिळणाऱ्या मिठीतील मिठासपणा तास न तास फेसबुकवर च्याटींग वा शेरिंग करून मिळणार नाही...मिळेल का?...

जीवनात अमुल्य असतो तो वेळ आणि वेळेचा खेळ करणारे हे जाळे.. social networking..

सोशल नेट्वर्किंग हे सोशल ड्रिंकिंग प्रमाणे आहे, प्रत्येकालाच माहिती असते, कि in proper amount alcohol is cardioprotective. पण होत काय? More than 80 % get addicted.
तीच नशा या सोशल नेट्वर्किंग साइट मध्ये आहे..

खर सांगायचं तर हि एक चांगली आवड आहे,
पण मेख कुठे आहे महिताहेत, ती आवड, आवड न राहता व्यसन बनते..

शनिवार, १५ मार्च, २०१४

"मैत्री"

जिवनातील प्रत्येक प्रवाहावरती, 
नवे मित्रनवनवे संघर्ष आहे,,
कधी नूतन मैत्रीचा मधुर स्पर्श,
तर मित्रांच्या कप्प्यात कधी चेष्ठाकधी हर्ष आहे..

                  कधी जिंकतोकधी चुकतो,
                  प्रत्येक क्षण एक नूतन आठवण आहे,,
                  वात्सल्यस्नेहप्रेमाने ओतप्रोत,  
                  खरच मैत्री हे एक जीवन आहे.. 

मजकडे दिमासारखी प्रतिभा नाही,
पण आपल्यासारख्या  कृष्णाचा सहवास आहे,,
म्हणूनच सुदाम्याला सहज शब्द स्फुरले,
बाकी हि कविता तर आभास आहे..

                  मैत्री..
                  कुणासाठी फक्त दोन शब्द,
                  तर कुणाची कुराण गीता आहे,,
                  कुणाची प्रीतीची थेंबा थेंबाची क्षुधा,
                  कुणासाठी स्नेहाची अविरत सविता आहे..

मला..
मी यशोशिखरी पोहचलो तरी,
मित्रांवाचून रिता आहे,,
कारण...
जिचा आरंभ ही नाही अन अंत ही नाही,
"मैत्रीअशी एक कविता आहे..
                    
    डॉ. सचिन शेंडे.

हिरवा ऋतू


पुन्हा तोच


मित्र


मैत्रीवचन

काळ बदलतो


पहिला पाऊस


तू मी जरी नश्वर

कसे मी करावे


प्रत्येकालाच

 

क्षणात लाटांसारख्या


तुझ्या फसव्या हसण्यात


जातांनी तुझ्या डोळ्यातील


शुक्रवार, १४ मार्च, २०१४

आई ....




माझे शब्द,, माझे मन ..


तू माझी,, मी तुझा…


तुझ्या डोळ्यात ……


Jara asech