"Welcome"

"Welcome"

गुरुवार, २४ मार्च, २०११


भावना जेथे शून्य होतात...

आत्मवृत्त..शव विच्छेदाकाचे...

(अवघ्या दोन महिन्यातच फोरेन्सिक मेडिसिन च्या  पोस्टिंग  मध्ये ,
अनुभवलेली  दुख्खीत विच्छेदाकाची ही व्यथा....)

एकही शब्द न बोलता, हृदयात सर्वांच्याच शिरतो आहे,,
भावनांना गहाण ठेवून, स्वतःचेच हृदय स्वतः चिरतो आहे..१

कराला साथ आयुधाचा, अश्रू आटले  रक्ताच्या चिखलात,,
हरित सौख्य धरेचे लपले, शुष्क लालेलाल आक्रांतात..२

फाटक्या विश्वात फाडतो आहे, मग क्षमा कशाला माणुसकीची,,
जीवनालाच जगण्याची लाज नाही, काय ही माया नीतीची..३

सुखामागे धावणाऱ्या मानसा, तुझ्यापेक्षा खरच  प्रेतं बरी,,
सर्वांना प्रीत देवून आसवांची, सांगतात दुखःची सीमा खरी..४

मी प्रेतामध्ये जगतो आहे, कारण काळजी आहे संसाराची,,
चिमुकल्यांसाठी चिरतो आहे, त्यांच्या करांना नको कळा 'या' काराची..५

मन सुखदुखः चे क्षितीज, जीवन आहे मरणाच्या आधारी,,
भावना जिथे शून्य होतात, तिथल्या व्यापाचा मी व्यापारी..६

हृदयांना कापता कापता माझे हृदय इतके विशाल व्हावे,,
सर्व अंतरातील दुखः नी या अथांग सागरात बुडुनी जावे..७

मी, शव विच्छेदक,, एक अस्थिपंजर अज्ञ अहर्निश आराधनेचा,,
ओतप्रोत प्रमोद देवून, मी यती 'या' व्यथित साधनेचा..८
 
                                             सचिन शेंडे.. २४/०३/११..
 

शनिवार, १९ मार्च, २०११


घाटीतील नूतन मित्रांना एका कवितेत एक करण्याचा हा तुटक प्रयत्न..

नवे मित्र, नवे शहर,....
नवे अनुभव, नवी लहर,...
नवा बहाणा, आलाय कवितेचा बहर.....

मी चैतन्य जसा अबोल तसा धन्य, कवितांचे संगे घेवून सैन्य,,
समिरासाराखेच माझे अस्तित्व, ते जाणवते जरी दिसते नगण्य..

राहुल तुझ्यासह प्रत्येक पाऊलावर, दुखांनी चाहूल सुद्धा केली नाही,,
माझ्या मनातील हळवेपणाला तू हळुवार सावरतांना, चाहूल सुद्धा दिली नाही..

नावापेक्षाही निर्मळ, सरळ तसा दुर्मिळ ही, जणू सहजतेचा अनन्वय,,
कधी कठीण कौस्तुभ, कधी घाटीतील कनवाळू केतानात, प्रेम क्षेमाचा समन्वय..

बळवंत तुझे असणे जिवंतजणू प्रशांत विनोदाची आरास अनंत,,
क्लेशाचा विनाशकारी निलेश, शैलेश, संतोष, विजयानंद असल्यावर कसली खंत..

कपिलाचा प्रगल्भ प्रकाश आम्हा, अन किरण हे अदभूद्याचे,,
आम्ही श्रीराम स्थिर महावीर,, घेवूनी ध्येय उदयाचे, ठेवतो बंध हृदयाशी हृदयाचे..

श्याम असा सुंदर सखा, मग बघा, का ? मला माझा गौरव नसावा,,
ज्या अतुल अनुरागने आपणासह माझी आपुलकी, मी ही तितकाच आपला असावा..
मी ही तितकाच आपला असावा…. मी ही तितकाच आपला असावा….

या अवघ्या सात महिन्यातच, घाटीच्या सप्तरंगात रंगणारे आम्ही,,
रुग्नांच्या एकेक वेदनेला, जखमेला, आईच्या हाताने स्पर्शणारे आम्ही,,
आज रसिक बनून जीवन जगू शकत नसलो, तरी जीवनात रसिकता जपणारे आम्ही,,
आज मंगळावर जीवन शोधू शकत नसलो, तरी जीवनात मंगळ शोधणारे आम्ही..
अशा माझ्या सर्व पी . जी. मित्रांसाठी ,,

मी यशो शिखरी पोहचलो तरी आपणावाचून रिता आहे,,
कारण....
जिचा आरंभ ही नाही आणि अंत ही नाही, मैत्री अशी एक कविता आहे..

 
मैत्री अशी एक कविता आहे.. मैत्री अशी एक कविता आहे…..


आपलाच
सचिन शेंडे..




शुक्रवार, १८ मार्च, २०११

प्रेम म्हणजे दर्शन....



जर प्रेम म्हणजे दर्शन, तर मग प्रदर्शन का करावं लागत,,
जर प्रीतीची प्रचीती प्रत्यक्षात, तर मग तुला गृहीत का धरावं लागत..

कधी डोळ्यातील सहज बोलकेपणा, कधी शब्दातील अबोल भावना,,
तर कधी अश्रूंनाही कवितेत रीत करून, शब्दांना सावरावं लागत..

तुझ्या डोळ्यात शिरलो कि परतीला उशीर होतो हे खरे,,
पण नयनातून भावना कळतात, तर मग शब्दांना का स्मराव लागत..

तुझे रुसतांनाही हसणे, तुझे नसतांनाही असणे,,
समजले नाही अजूनही मजला काही, का? डोळ्यातूनच बघावं लागत..

तू मृगजळासारखी मिळून, जेंव्हा भ्रमिक भासातही दूर जाते,,
तेंव्हा कळून कळेला कन-वाळून मग खळखळून हसावं लागत..

सृष्टीतील  अखिल अनुरागला एका क्षणात विसरावं वाटत,,
जेंव्हा जीवन तुला समर्पून मला तुजवीण जगावं लागत..

श्वासांना तरी एकदाचे थांबवता येईल, पण तुझ्या आठवणीचे काय?
एकदाचं पूर्णतः जगण्यासाठी मला परत पुन्हा पुन्हा मरावं लागत..
                                                        
                                                           सचिन शेंडे.. दिनांक १८/०३/२०११