जर प्रेम म्हणजे दर्शन, तर मग प्रदर्शन का करावं लागत,,
जर प्रीतीची प्रचीती प्रत्यक्षात, तर मग तुला गृहीत का धरावं लागत..
कधी डोळ्यातील सहज बोलकेपणा, कधी शब्दातील अबोल भावना,,
तर कधी अश्रूंनाही कवितेत रीत करून, शब्दांना सावरावं लागत..
तुझ्या डोळ्यात शिरलो कि परतीला उशीर होतो हे खरे,,
पण नयनातून भावना कळतात, तर मग शब्दांना का स्मराव लागत..
तुझे रुसतांनाही हसणे, तुझे नसतांनाही असणे,,
समजले नाही अजूनही मजला काही, का? डोळ्यातूनच बघावं लागत..
तू मृगजळासारखी मिळून, जेंव्हा भ्रमिक भासातही दूर जाते,,
तेंव्हा कळून कळेला कन-वाळून मग खळखळून हसावं लागत..
सृष्टीतील अखिल अनुरागला एका क्षणात विसरावं वाटत,,
जेंव्हा जीवन तुला समर्पून मला तुजवीण जगावं लागत..
श्वासांना तरी एकदाचे थांबवता येईल, पण तुझ्या आठवणीचे काय?
एकदाचं पूर्णतः जगण्यासाठी मला परत पुन्हा पुन्हा मरावं लागत..
सचिन शेंडे.. दिनांक १८/०३/२०११

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा