"Welcome"

"Welcome"

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

गारवा

















गारवा...........

गारवा हा श्रावनाचा, नभी साम्राज्य  मेघांचे..
हिरवा शृंगार धरेचा, रिमझिम मौतिक रेघांचे..

मणि कल्लोळ कल्पनांचा, सुर आले ओठान्वर्ती ,
शीतल स्पर्श समिराचा, देहात शिरुनि हिव भरती,
व्रत वैशाखी उन्हाचा, सोडिला वरुनाच्या पंच्याम्रुताने,
रम्य रजनीचे धुंदीत गाने, जणू पुरावे चैतन्याचे....१

मयुराचे मोहित नर्तन, मधुर हा मृद्गंध,
विहंगमाचे प्रणय गीत, जणू विधुजोस्त्नेचे अनुबंध,
अम्बराच्या अवतारणा  ऱ्या प्रीतीने ओलिचिम्ब झाली धरा,
एक एक थेम्ब वरुनाचा जणू प्रतिक समर्पनाचे...२

खळ खळ वाहते सरिता, हळूच फान्द्यांचे डुलने,
नूतन प्रीत व्योमधरेची, क्षितिजावरती फूलने,
सुरेख स्रुष्ठिची सर्वत्र व्याप्त जिवंत रसिकता,
मी रसिक होवून तुझा, सौख्य बघतो हे जिवानांचे...3

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: