जमले नाही मला..
चुका करतांनाही अचूक असणे,,
जमले नाही मला...
काटेकोर कायद्यानुसार व्यंगावरच हसणे,,
जमले नाही मला...
तुझ्यात मी असतांनाही नसणे,,
जमले नाही मला...
स्वप्नातही अस्तित्वाला बघणे,,जमले नाही मला...
रागांचाच भाग म्हणून आपल्यांवर रुसणे,,
जमले नाही मला...
घामासह फुलांच्या गंधात पसरणे,,
जमले नाही मला...
डोळ्यात शिरतांना अश्रूंना विसरणे,,
जमले नाही मला...
शब्दात गुदमरून मनाला मोकळे करणे,,
जमले नाही मला...
परार्थ हितासाठी स्वतः हरणे,,
जमले नाही मला...
कडू कडव्यातही मधुत्व जपणे,,
जमले नाही मला...
डोळ्या पुढील अस्तित्वाला गृहीत धरणे,,
जमले नाही मला...
चैतन्य असूनही चैतन्याने जगणे,,
जमले नाही मला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा