मी आणि माझे शब्द !
मी अणि माझे शब्द ,
एका सत्याच्या शोधात आहे..
एकांतात सुखी व समाधानी पण,
माणसात मन मात्र क्रोधात आहे..
स्वत: स्वताहसाठी जगाव,
असा खुपदा माला वाटत..
पण जगातील ललित स्नेह लोचानत येताच,
मोहविरहित मन मध्येच फाटत..
क्रोध माझ्या भ्रमिक कल्पनांचा की,
स्रुष्ठितिल अखिल अनुरागाचा..
स्वताचे अस्तित्व साध्य कराया शौर्य नाही,
आणि खोटा अभिमान खोट्या त्यागाचा..
प्रीत पहाया डोळ्यात दृष्ट्री हवी,
धरेवर करुना, लोभ अनंत आहे..
अमित मित्रात असुनही सखा नाही,
ही एकच माझी खंत आहे..
जिभेने फक्त अणि फक्त खायचे,
तरीपण सर्व लक्ष क्षुधेत आहे..
ललित लोचानाची लालसा तर यतिलाही,
मूर्खा मित्रविना तू जिवंत प्रेत आहे..
आजही मी अणि माझे शब्द ,
एका सख्याचा शोध घेत आहे....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा