जर तू वर्गात नसलीस तर, मी असूनही नसतो हजर,,
भेटीत पहिल्या तू मुकी, मी मुका..बोलून गेली एकमेकांशी नजर..
सुरवात कुणी करायची? माझा बाणा नि तुझा "मी" पणा,,
पुन्हा प्रेमकथेत सुरवात न होता, झाला "जरतरीत "शेवटाचा गजर..
कधी फुले, कधी कळ्या,, भावनाही निशब्द सगळ्या.,,
फुलणार कधी? कळणार कधी? कळ्या, फुलातच राहिले "ते" जन्मभर..
पहिल्या पावसाची प्रतीक्षा, गर्वाने दिली पुन्हा मुहुर्तास शिक्षा,,
पुन्हा श्रावणात सरसरते शिरवे, पुन्हा आला वसंतास बहर..
तुझ्या वाटेतील काटे वेचण्यासाठी, फक्त कवितेपुरता झालो ताठ,,
पुन्हा वाट...तू येत राहिली..तू जात राहिली..स्वप्नात रात्रभर..
बोलण्याचे धैर्य..मित्रांशी फेकण्यात, शौर्य शब्दांपुरत सीमित,,
समोर नजरेत तुझ्या गैरहजर, प्रेमाच्या खोल डोहात पोहतो वरवर..
प्रेम भिल्लान्सारख जमत नसेल तर, गुलाबी बाणाचा गुलकंद बनव,,
प्रेमाचा उदय जरी फुल, गुलदस्त्यात., ते बहरत.. असेल जर मन कणखर..
पुन्हा तू वर्गात, मी तुझ्या तर्कात, सहज पोहचलो प्रेमाच्या स्वर्गात,,
कणभर मनाला मुठीत ठेवाया..मी लढतच राहिलो जीवनभर..
तरी पण... कशी ? बोलून गेली एकमेकांशी नजर..
सचिन शेंडे..दि.२९/०२/२०१२..