"Welcome"

"Welcome"

शनिवार, ३० जुलै, २०११

कविता..


अचानक पाउस आला कीआठवणींना पूर येतो,,
मनात आटलेल्या प्रीतीलाओलचिंब करून वाहून नेतो..                                            

विरहाच्या वाळवंटात, तुझ्या स्मृतींनी मिळतो गारवा,,
वरुणाची करूणा घेवून, मी शब्दांशी प्रवाह धरतो नवा..

थेंबाथेंबांची वाट पाहता, आला पावसाचा लोट,,
तुझ्या स्वैच्छिक स्पर्शासाठी, आतुरले माझे ओठ..

तुझ्या लावण्याच्या लालसेत, मन पाऊस पाऊस,,
क्षुधा उदकाची घेवून, शिराव उदधित जस..

न्हावून निरात नभाच्या, विरले अश्रू नयनातले,,
ओतप्रोत प्रमोद देणारे, शब्द शोधिले मी मनातले..

व्यथा विरहाची विसरून, जीवनाने भरल्या सविता,,
प्रीत बघून धरेची, अवतरली अंबरातून कविता..
                           
सचिन शेंडे..दि. ३०/०७/२०११