आदी आधारावर आई,
आजही दुख्खात पहिले
तुझेच नाव येई,,
नमन विश्वाच्या प्रथम
गुरूला,
आई तुजमुळे आज
मी सर्वकाही..
गुरुविण पूर्ण कसा मी, शिक्षकांनी दिलेल्या सुसंस्कारात आहे,,
त्यांच्याच आशिषने आज,
आपल्या विद्यार्थी परिवारात आहे..
माझ्या शिक्षकांवर एक कविता लिहून,
मला कृतज्ञता सिद्ध करायची नाही,,
आपल्या आज्ञेत आणि स्नेहात,
एकलव्याची कथा स्मरायाची नाही..
ज्या क्षणी चुकेल सर त्या क्षणी
छडी द्याल,,
गुरुशिष्याच्या नात्यातील प्रीत आजही
आहे,
ती कधी गृहीत धरायची नाही..
तुमची प्रेरणा तुमचा प्रकाश,
माझ्या
अदभूद्द्याचे प्रतिक आहे,,
तुमचा विद्यार्थी म्हणून गोड आठवात
रहावा,
हे स्वर्ग सुखावून अधिक आहे..
आपल्या अनुभवाचा आधार आहे,
आणि
या सुशील सह्वासाबद्दल श्री चा आभार आहे,,
आपल्या आदरात, सख्यांच्या स्नेहात,
हा औषधशास्राचा हा आनंदी परिवार आहे..
सर वर द्या कृतज्ञतेचा,
चरण स्पर्शून हेच समर्पण नवे,,
मागणे एकच...
जन्मभर पुरेल इतके भरून आशीर्वाद हवे,...
जन्मभर पुरेल इतके भरून आशीर्वाद हवे...
सचिन शेंडे...दि.५/९/२०११
