"Welcome"
"Welcome"
शनिवार, २१ जानेवारी, २०१२
कधी कधी वाटते,,...
ओझे झेलणे रोजचेचं आज, एकदाचे शांत बसुनी घ्यावे,,
मागे न चालताही गळलो हे कळून,पुढल्या वळणाच्या पुढे न जावे..
तुझे अमोल बोल ऐकतांना, मी अबोलपणे तुझ्यात खोल जावे,,
बेधुंद बुडण्यातही मजा, फक्त असा तोल जाता तू सावरावे..
कधी कधी वाटते,,...
रोज नव्या उत्तराच्या शोधात, एकदाचे प्रश्न सगळे विसरावे,,
जुण सोडवताच पुन्हा नवीन कोडं, कधी शोधून उत्तरं प्रश्नांनीच उत्तरावे..
एरवी वादळे उठतात मी तोंड उघडताच, पण परिहास बघ...,
ओठ दाबुनी तुझ्या श्वासात, भासातच का पण गप्प बसावे..
कधी कधी वाटते,,...
तुझी प्रीत हि फसवी, तुझे स्मित हि चकवे,,
पण तुझे प्रेमाने हसतांना, मी पुन्हा चकण्यात फसावे..
मी तुझ्या शोधात आणि जीवन माझ्या, या शोधाशोधीत,,
जरी परतून न पहिले जीवनाने मला,, पण परत तुला पुन्हा परतून बघावे..
कधी कधी वाटते,,...
भेटलीस ना..कि हृदय सगळ..करावं मोकळ..वाटताच.. खुळ..झाल वेगळ,,
माझ्यात असूनही माझे कधी नव्हते, आज बहाणा.. न भेटताही मला कळावे,,
पण आज..तुझ्या कोरड्या नयनात भिजतांना, अश्रुची नशा कळली मला,,
कधी दाटते तुझ्या आठवात.. कधी वाटते तुझ्या आठवात, भान हरपून फक्त रडावे..
..सचिन शेंडे..
गुरुवार, १२ जानेवारी, २०१२
शनिवार, ७ जानेवारी, २०१२
वर मला विश्वास..
माझे तळमळ ने रोजचे जरी, दररोज नवा उल्हास,,
आजही मनात माझ्या, तुझ्या येण्याचा भ्रमिक भास..
प्रिये सांग एकदातरी, तुजकडे कोणती किमया खास,,
अपयशाचे भाकीत माहित आहेत, तरी प्रयत्नावरती पूर्ण विश्वास..
तुझ्या तनुच्या सुगंधाने, होतो सुमनांचा परिहास,,
प्रणीत पारिजात देतो, तुजसाठी फाल्गुनी सुवास..
श्रावानापासूनच आरंभ, आज पुन्हा आले श्रावणमास,,
साक्षीला हे सरसरते शिरवे आणि रम्य उन्हाची रास..
वार्षिक व्रताची आज सांगता, प्रीतीने प्रार्थिले श्रावणास,,
शब्दांच्या जुळवा जुळवीत बघ, किती अधीरता मनास..
तुझ्याशी प्रीतीचा विकास होतांना, जरी माझा होत होता ऱ्हास,,
दुकान झाले गहाण आणि घरास लावला गळफास..
वडिलांनी लात मारून जेंव्हा आशीर्वाद दिला अपुल्या प्रेमास,,
संसार विकला तसे स्वतःला विकेल, फक्त तू हजेरी दे लिलावास..
तू येतेस आणि जातेस कशी? आश्चर्य याचे वरुनास,,
पुढल्या श्रावणाची प्रतीक्षा, " करुणाकरा" वर मला विश्वास..वर मला विश्वास..
..सचिन शेंडे..
रविवार, १ जानेवारी, २०१२
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जुना मी जरीही, तरी आज नवी बात आहे,,
नवा उत्साह नवचैतन्याने, हि बारात..., सुरवात आहे..
पुन्हा जुने ते संकल्प, लिहूया नव्याने,,
नववर्ष नवा उत्कर्ष , तोच हर्ष नव्या प्रवासात आहे..
आता असे चालायचे कि, पाऊल खुणाही मार्गदर्शक ठरतील,,
आता आदर्श सोडून जायचं आहे, जसे आदर्श जगण्यात आहे..
" नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे जावोत",,
शब्द जुनेच, पण शुभेच्छा नव्या उमेदीने देण्यात आहे..
रोजच्याच आदित्याची आज,, नवी प्रभात आहे,,
जुना मी जरीही, तरी आज नवी बात आहे..
सर्वांना....
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
..सचिन शेंडे..१/१/२०१२..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)




