"मैत्री.."
जिवनातील प्रत्येक प्रवाहावरती,
नवे मित्र, नवनवे संघर्ष आहे,,
कधी नूतन मैत्रीचा मधुर स्पर्श,
तर मित्रांच्या कप्प्यात कधी चेष्ठा, कधी हर्ष आहे..
कधी जिंकतो, कधी चुकतो,
प्रत्येक क्षण एक नूतन आठवण आहे,,
वात्सल्य, स्नेह, प्रेमाने ओतप्रोत,
खरच मैत्री हे एक जीवन आहे..
मजकडे ग. दि. मा. सारखी प्रतिभा नाही,
पण आपल्यासारख्या कृष्णाचा सहवास आहे,,
म्हणूनच सुदाम्याला सहज शब्द स्फुरले,
बाकी हि कविता तर आभास आहे..
मैत्री..
कुणासाठी फक्त दोन शब्द,
तर कुणाची कुराण गीता आहे,,
कुणाची प्रीतीची थेंबा थेंबाची क्षुधा,
कुणासाठी स्नेहाची अविरत सविता आहे..
मला..
मित्रांवाचून रिता आहे,,
कारण...
जिचा आरंभ ही नाही अन अंत ही नाही,
"मैत्री" अशी एक कविता आहे..
डॉ. सचिन शेंडे.
