"स्वातंत्र्य दिन चिरायू होवो"
१५ ऑगस्ट २०१०
आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..
आसेतु हिमाचलाप्रमाणे इथे प्रत्येकाला अभय आणि स्वाभिमान आहे,
गंगेप्रमाणे पवित्र इथली मने, जिंकण्या बुद्धाप्रमाणे अटळ ध्यान आहे,
का न? मला माझा गर्व व्हावा, कि हा हिंदवी स्वर्ग माझा आहे,
या भारत भू ला शतदा नमन, जिच्या प्रत्येक दर्शनी मंगेश आहे..
आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..
आज वंदे मातरम म्हणतांनी जो प्रत्येक मनात अभिमान आहे,
सार्वभौम, सर्वधर्मसमान संस्कृतीचा माझा देश महान आहे,
"स्वातंत्र्य दिन चिरायू होवो" यातच आमचे सौख्य सामावले आहे,
असंख्य हृदयाचा जिथे एक उदय, अनेक भाषा अनेक वेश आहे,,
आम्हा सामान्यातही एक विशेष आहे, कारण भारत माझा देश आहे..क्रमशः..
१५ ऑगस्ट २०११ ..
तोच अभिमान तोच दिन...
त्याच भावना, तोच सचिन..
तरीपण...
चौसष्ठ वर्षानंतरही, तीनशे चौसष्ठ दिनानंतरही हाच एक संदेश आहे,,
आज मला पुन्हा आठवले कि, "भारत माझा देश आहे."..
आज पुन्हा गांधीजींना हार घालून,
सत्य,अहिंसेवर प्रहार होईल,,
पुन्हा मातृभूमीचे शतदा आभार मानून,
जन्मदेवरच मी भार होईल,,
फक्त कारणे बदलते आहे,
तिच हिंसा, असहकारही आजही कायम आहे,
विकासाच्या पावली वर्षेही बदलली,
तरी या अदभूदयातही गांधीना का? क्लेश आहे..१
आज मला पुन्हा आठवले कि...
कुणी पोट शांत कराया घाम गाळतो,
कुणाचे एसीत शांतीच्या नाऱ्यावर घाम गाळणे,,
असंतोषाला शिष्ठचारात सांभाळून,
भ्रष्ठाचाराविरुद्धच्या घोषणा फक्त भाषणा पुरत्या पाळणे,,
शहिदांच्या रक्तातील आक्रंदन, आवाहन,
का? आम्ही मौन म्हणून पाळतो,
स्वातंत्र्याच्या संतोषी संस्मरनातही,
का? आज प्रत्येक शब्दात द्वेष आहे..२
आज मला पुन्हा आठवले कि...
कसले स्वराज्य? स्वतः चे कि "राजाचे",
नुसते कोट्यानु कोट्यांचे घोटाळे,,
कसली राजनीती? सगळी "राजाची" अनीती,
हि वस्तुस्थिती जो तो टाळे,,
स्वातंत्र्य दिनावर एक कविता लिहून
मला माझे देशप्रेम सिद्ध करायचे नाही,
"माझा देश आणि माझे बांधव"
यातच सौख्य सामावाल्याचा हा त्वेष आहे..३
आज मला पुन्हा आठवले कि...
सचिन शेंडे दि. १५ ऑगस्ट २०११..
"स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा