जेन्हा काळ्याभोर शेतात, हिरव्यागार रोपट्यांवर, सोनेरी किरणे पडते,,
तेंव्हा सृष्ठितील सर्वश्रेष्ठ सौंदर्याचा एका क्षणात साक्षात्कार घडते..
हे भलेमोठे धिप्पाड वृक्ष जेंव्हा मजपासून कनाकांना लपवितात,,
आणि आपल्या शितल पल्लवीला रवीच्या रश्मीने तपवितात..
तेंव्हा असं होत, मजकडे येणारी स्वरूप तनुजा येतांना मध्येच वळली,,
मी बहरतांना पाहिलेल्या गुलमोहराची जणू क्षणात पाने गळली..
पुन्हा एकदा क्षितिजावरती अरुणाची करूणा मला मोहिते ,,
आणि सरोवराच्या स्तब्ध सलीलात तांबडे रेशीम पोहिते..
जेंव्हा माझ्या चोरून भास्कर लपून ढगाआड जातो,,
तेंव्हा गाडीमध्ये नजर फिरविताच मजसोबत एकांत राहतो..
अस्ताची चाहूल असूनसुद्धा ती सूर्याची जिवंत रसिकता,,
सुगंध जवळ नसूनसुद्धा सुमनांना लाजवणारी सुवासिकता..
परार्था प्रकाश देण्यासाठी तुझे प्राचीला येणे,,
त्याच व्याकुळतेने आजच्या अस्तालाही अपुले म्हणने..
भास्करा तू तुझा देह गर्वाने गिरी आड नेणे,,
मी विसरू कसे कळेना दृश्श ते जीवघेणे..
कसा मी मृत्यूला आठवात घेवून जगणे विसरत होतो,,
कोण इथे अमर्त्य मित्रा, प्रचंड प्रकाशातही तमाला स्मरत होतो..
दिनकरा, तुझ्या दयेचा जरी हा रोजचाच आविष्कार,,
जरी उदयाचा मोह जगाला, आज दिला मला, सुर्यास्तानेच सुविचार..
..सचिन शेंडे.... दिनांक..४/६/२०११..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा