"Welcome"

"Welcome"

गुरुवार, १ मार्च, २०१२

..बोलून गेली एकमेकांशी नजर..


जर तू वर्गात नसलीस तर, मी असूनही नसतो हजर,,
भेटीत पहिल्या तू मुकी, मी मुका..बोलून गेली एकमेकांशी नजर..

सुरवात कुणी करायची? माझा बाणा नि तुझा "मी" पणा,,
पुन्हा प्रेमकथेत सुरवात न होता, झाला "जरतरीत "शेवटाचा गजर..

कधी फुले, कधी कळ्या,, भावनाही निशब्द सगळ्या.,,
फुलणार कधी? कळणार कधी? कळ्या, फुलातच राहिले "ते" जन्मभर..

पहिल्या पावसाची प्रतीक्षा, गर्वाने दिली पुन्हा मुहुर्तास शिक्षा,,
पुन्हा श्रावणात सरसरते शिरवे, पुन्हा आला वसंतास बहर.. 

तुझ्या वाटेतील काटे वेचण्यासाठी, फक्त कवितेपुरता झालो ताठ,,
पुन्हा वाट...तू येत राहिली..तू जात राहिली..स्वप्नात रात्रभर..

बोलण्याचे धैर्य..मित्रांशी फेकण्यात, शौर्य शब्दांपुरत सीमित,,
समोर नजरेत तुझ्या गैरहजर, प्रेमाच्या खोल डोहात पोहतो वरवर..

प्रेम भिल्लान्सारख जमत नसेल तर, गुलाबी बाणाचा गुलकंद बनव,,
प्रेमाचा उदय जरी फुल, गुलदस्त्यात., ते बहरत.. असेल जर मन कणखर..

पुन्हा तू वर्गात, मी तुझ्या तर्कात, सहज पोहचलो प्रेमाच्या स्वर्गात,,
कणभर मनाला मुठीत ठेवाया..मी लढतच राहिलो जीवनभर..
तरी पण... कशी ? बोलून गेली एकमेकांशी नजर..

सचिन शेंडे..दि.२९/०२/२०१२..

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

मैत्री हे असे बंधन



कधी कधी वाटते,,...
ओझे झेलणे रोजचेचं आज, एकदाचे शांत बसुनी घ्यावे,,
मागे न चालताही गळलो हे कळून,पुढल्या वळणाच्या पुढे न जावे..
तुझे अमोल बोल ऐकतांना, मी अबोलपणे तुझ्यात खोल जावे,,
बेधुंद बुडण्यातही मजा, फक्त असा तोल जाता तू सावरावे..

कधी कधी वाटते,,...
रोज नव्या उत्तराच्या शोधात, एकदाचे प्रश्न सगळे विसरावे,,
जुण सोडवताच पुन्हा नवीन कोडं, कधी शोधून उत्तरं प्रश्नांनीच उत्तरावे..
एरवी वादळे उठतात मी तोंड उघडताच, पण परिहास बघ...,
ओठ दाबुनी तुझ्या श्वासात, भासातच का पण गप्प बसावे..

कधी कधी वाटते,,...
तुझी प्रीत हि फसवी, तुझे स्मित हि चकवे,,
पण तुझे प्रेमाने हसतांना, मी पुन्हा चकण्यात फसावे..
मी तुझ्या शोधात आणि जीवन माझ्या, या शोधाशोधीत,, 
जरी परतून न पहिले जीवनाने मला,, पण परत तुला पुन्हा परतून बघावे.. 

कधी कधी वाटते,,...
भेटलीस ना..कि हृदय सगळ..करावं मोकळ..वाटताच.. खुळ..झाल वेगळ,,
माझ्यात असूनही माझे कधी नव्हते, आज बहाणा.. न भेटताही मला कळावे,,
पण आज..तुझ्या  कोरड्या नयनात भिजतांना, अश्रुची नशा कळली मला,,
कधी दाटते तुझ्या आठवात.. कधी वाटते तुझ्या आठवात, भान हरपून फक्त रडावे.. 
                                                                                     ..सचिन शेंडे..

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

कागदावरील फुलं कितीही मोहक असले,
तरी त्याला गंध नसतो..
नव्या मैत्रीत कितीही उत्सुकता असो,
जुन्या मैत्रीचा ओलावा बंध नसतो..

खास शाळेतील मित्रांसाठी....सचिन 

व्यक्तीचे रूपं बदलतात, कर्तव्य बदलतात,,
बदल हा एक नियम आहे..
मात्र जुन्या मित्रांच्या मैत्रीमद्धे,
तोच गोडवा कायम आहे...
खास शाळेतील मित्रांसाठी....सचिन